तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी सत्तेत आल्यानंतर घेतलेल्या एका निर्णयामुळे राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला. आपल्या एका निकटवर्ती ज्योतिषाची थेट मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करणे त्यांना महागात पडले असून, विरोधकांच्या टीकेनंतर अवघ्या २४ तासांत हा निर्णय मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
#TamilNadu #CMVijay #PoliticalNews #Lokmat #TamilNaduPolitics #BreakingNews